१७७. अधांतर
कोण श्रेष्ठ नी कोण क्षुद्र
सगळ्यांचेच तर मातीचेच पाय
कोणी कितीही असो शहाणा
प्रारब्ध कोणाला चुकलंय काय
कधी सुख कधी दु:ख
हिंदकळत असतं आयुष्य
कितीही शोध घेतला तरी
उमगत नाही भविष्य
काय खरं नी काय खोटं
ज्याचं त्यालाच माहीत
हेच खरं असतं शेवटी
कोणीच कोणाचे नाहीत
कसला जन्म नी कसलं मरण
आहेत सगळे नुसते भोग
वाट बघणं हाती असतं
कधी येणार सुटकेचा योग
--- लबाड बोका
कोण श्रेष्ठ नी कोण क्षुद्र
सगळ्यांचेच तर मातीचेच पाय
कोणी कितीही असो शहाणा
प्रारब्ध कोणाला चुकलंय काय
कधी सुख कधी दु:ख
हिंदकळत असतं आयुष्य
कितीही शोध घेतला तरी
उमगत नाही भविष्य
काय खरं नी काय खोटं
ज्याचं त्यालाच माहीत
हेच खरं असतं शेवटी
कोणीच कोणाचे नाहीत
कसला जन्म नी कसलं मरण
आहेत सगळे नुसते भोग
वाट बघणं हाती असतं
कधी येणार सुटकेचा योग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा