१७६. अमावास्या
कसा जगू तुझ्याशिवाय
उरलो एकटा दैववशात
ताट आहे पुढ्यात पण
घास अडकतो घशात
का जगतोय मी अजून
जीव अडकलाय कशात
निसटून गेले अनमोल क्षण
काय राहिलंय आता पशात
काय उपयोग ह्या डोळ्यांचा
दिसतही नाही प्रकाशात
आयुष्य झालंय अमावास्या
चंद्रच नाही आकाशात
--- लबाड बोका
कसा जगू तुझ्याशिवाय
उरलो एकटा दैववशात
ताट आहे पुढ्यात पण
घास अडकतो घशात
का जगतोय मी अजून
जीव अडकलाय कशात
निसटून गेले अनमोल क्षण
काय राहिलंय आता पशात
काय उपयोग ह्या डोळ्यांचा
दिसतही नाही प्रकाशात
आयुष्य झालंय अमावास्या
चंद्रच नाही आकाशात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा