१७८. शिकवण
वाटेल एखादी गोष्ट क्षुल्लक
करू नका म्हणून दुर्लक्ष
एका चुकीच्या निर्णयानेच
आयुष्य मग होतं रूक्ष
टाका झटकून आळस सगळा
पावलो पावली रहा दक्ष
ढळू द्यायचा नसतो कधी
ध्येयावरून आपला अक्ष
समजू नका कमी स्वत:ला
करा एकाग्र सारं लक्ष
एका छोट्या बीजाचाच पुढे
होतो प्रचंड वटवृक्ष
--- लबाड बोका
वाटेल एखादी गोष्ट क्षुल्लक
करू नका म्हणून दुर्लक्ष
एका चुकीच्या निर्णयानेच
आयुष्य मग होतं रूक्ष
टाका झटकून आळस सगळा
पावलो पावली रहा दक्ष
ढळू द्यायचा नसतो कधी
ध्येयावरून आपला अक्ष
समजू नका कमी स्वत:ला
करा एकाग्र सारं लक्ष
एका छोट्या बीजाचाच पुढे
होतो प्रचंड वटवृक्ष
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा