१७५. मोक्ष
कोणालाच नसते कल्पना कधी
काय वाढून ठेवलंय पुढ्यात
तरीही टाकतात पाऊल अजाणता
पडतात मग खड्ड्यात
कधी बेततं जीवावर
कधी निभावतं थोडक्यात
तरी कसा पडत नाही
प्रकाश कोणाच्याच बोडक्यात
काय उपयोग जगून असा
अंध:काराच्या वेढ्यात
मिळवून टाका मोक्ष एकदाचा
अडकू नका बेड्यात
--- लबाड बोका
कोणालाच नसते कल्पना कधी
काय वाढून ठेवलंय पुढ्यात
तरीही टाकतात पाऊल अजाणता
पडतात मग खड्ड्यात
कधी बेततं जीवावर
कधी निभावतं थोडक्यात
तरी कसा पडत नाही
प्रकाश कोणाच्याच बोडक्यात
काय उपयोग जगून असा
अंध:काराच्या वेढ्यात
मिळवून टाका मोक्ष एकदाचा
अडकू नका बेड्यात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा