१८३. हतबल
खुनी पापी राजकारणी
ठारच मारलं पाहिजे ह्यांना
माझं मलाच वाटतं आश्चर्य
कसा काय मी पावतो त्यांना
मलाच खरंतर वाटते भीती
ह्यांच्या उलट्या काळजाची
देऊन टाकतो मागतात ते ते
करून घेतो सुटका स्वत:ची
काय भरवसा ह्या लोकांचा
कोण लागेल ह्यांच्या नादी
देव असूनही हतबल मी
लाज वाटते मलाच माझी
--- लबाड बोका
खुनी पापी राजकारणी
ठारच मारलं पाहिजे ह्यांना
माझं मलाच वाटतं आश्चर्य
कसा काय मी पावतो त्यांना
मलाच खरंतर वाटते भीती
ह्यांच्या उलट्या काळजाची
देऊन टाकतो मागतात ते ते
करून घेतो सुटका स्वत:ची
काय भरवसा ह्या लोकांचा
कोण लागेल ह्यांच्या नादी
देव असूनही हतबल मी
लाज वाटते मलाच माझी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा