१८१. ज्याचे त्याचे भोग
टोचला जरी काटा पायात
दोष नसतो काट्याचा
भोगावा लागतो प्रत्येक भोग
आपल्या आपल्या वाट्याचा
असतो नेहमीच मार्ग खडतर
मोठा कोणीतरी होण्याचा
आगीत तावून सुलाखूनच
कस लागतो सोन्याचा
करावा लागतो कधी कधी
मांडा देखिल कोंड्याचा
बनवला जातो देव सुद्धा
कुठल्यातरी धोंड्याचा
--- लबाड बोका
टोचला जरी काटा पायात
दोष नसतो काट्याचा
भोगावा लागतो प्रत्येक भोग
आपल्या आपल्या वाट्याचा
असतो नेहमीच मार्ग खडतर
मोठा कोणीतरी होण्याचा
आगीत तावून सुलाखूनच
कस लागतो सोन्याचा
करावा लागतो कधी कधी
मांडा देखिल कोंड्याचा
बनवला जातो देव सुद्धा
कुठल्यातरी धोंड्याचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा