१७९. टवटवी
अज्ञाताच्या वाटेवरचा
मी एक क्षूद्र कवी
तरीही गातो आनंदाची
गाणी नित्य नवी
चिरंतनाच्या पोकळीमधून
रोज उगवतो रवी
तशीच निरंतर ऊर्जा मजला
रवीकडून हवी
रेखाटतो मी मनामध्ये
अशीच काही छवी
म्हणूनही असेल कदाचित
मला अशी टवटवी
--- लबाड बोका
अज्ञाताच्या वाटेवरचा
मी एक क्षूद्र कवी
तरीही गातो आनंदाची
गाणी नित्य नवी
चिरंतनाच्या पोकळीमधून
रोज उगवतो रवी
तशीच निरंतर ऊर्जा मजला
रवीकडून हवी
रेखाटतो मी मनामध्ये
अशीच काही छवी
म्हणूनही असेल कदाचित
मला अशी टवटवी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा