१८५. कसे
हे ही वाटते हवेसे मला
ते ही वाटते हवेसे
शोधत असते नजर सारखी
दिसते का काही नवेसे
सहज मिळत नसेल तेव्हा
वाटते ओरबाडून घ्यावेसे
पण विवेक माझा येतो आड
वाटते मला भ्यावेसे
राहिलो म्हणून सभ्य मी
तर होते माझे हसे
सांगा राव तुम्हीच आता
वागायचे तरी मी कसे
--- लबाड बोका
हे ही वाटते हवेसे मला
ते ही वाटते हवेसे
शोधत असते नजर सारखी
दिसते का काही नवेसे
सहज मिळत नसेल तेव्हा
वाटते ओरबाडून घ्यावेसे
पण विवेक माझा येतो आड
वाटते मला भ्यावेसे
राहिलो म्हणून सभ्य मी
तर होते माझे हसे
सांगा राव तुम्हीच आता
वागायचे तरी मी कसे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा