२०३. अस्वस्थ
आहे तसा सुखात मी
तेवढं एकच दुख्ख
देवाधर्मावरून भांडतय
जग माझं अख्ख
कसा राहू स्वस्थ मी
कसा राहू मस्त
डोळ्यांसमोर होतोय माझ्या
माणुसकीचा अस्त
कशी ठेवू श्रद्धा मी
जाणवत नाही अस्तित्व
ह्या साऱ्या अधर्माचं
कोण घेणार दायित्व
असा कसा होऊ नको
सांगा मी विचलित
मेल्या मनाचा नाही मी
नाही गात्र गलित
खरं तेच बोलत राहीन
जाणार नाही शरण
स्वस्थ मी असेन तेव्हाच
जेव्हा येईल मरण
--- लबाड बोका
आहे तसा सुखात मी
तेवढं एकच दुख्ख
देवाधर्मावरून भांडतय
जग माझं अख्ख
कसा राहू स्वस्थ मी
कसा राहू मस्त
डोळ्यांसमोर होतोय माझ्या
माणुसकीचा अस्त
कशी ठेवू श्रद्धा मी
जाणवत नाही अस्तित्व
ह्या साऱ्या अधर्माचं
कोण घेणार दायित्व
असा कसा होऊ नको
सांगा मी विचलित
मेल्या मनाचा नाही मी
नाही गात्र गलित
खरं तेच बोलत राहीन
जाणार नाही शरण
स्वस्थ मी असेन तेव्हाच
जेव्हा येईल मरण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा