२०४. कर्म फळ
शिकवतात एक आणि वागतात एक
गोंधळून जातात कोवळी मनं
बोलल्यासारखं वागायचं नसतं
हेच शिकतात लहान मुलं
आई बापच वागतात खोटे
मुलंही मग वागतात खोटी
देत नाहीत आदर सन्मान
जेव्हा ती होतात मोठी
म्हातारपणी काढल्यावर बाहेर
काय उपयोग काढून गळा
विषवल्ली लावून स्वहस्ते
नका अपेक्षू अमृत फळा
--- लबाड बोका
शिकवतात एक आणि वागतात एक
गोंधळून जातात कोवळी मनं
बोलल्यासारखं वागायचं नसतं
हेच शिकतात लहान मुलं
आई बापच वागतात खोटे
मुलंही मग वागतात खोटी
देत नाहीत आदर सन्मान
जेव्हा ती होतात मोठी
म्हातारपणी काढल्यावर बाहेर
काय उपयोग काढून गळा
विषवल्ली लावून स्वहस्ते
नका अपेक्षू अमृत फळा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा