२०५. खरं कारण
जन्म घेतो जीव जेव्हा
जन्माबरोबर जन्मते मरण
हजारो कारणं वाटतात पण
जन्मच असते मरणाचे कारण
मरण्यासाठीच करतो देह
अमर आत्म्याला धारण
आत्माच असतो देहाच्या
जगण्याला तारण
कधीतरी मग संपते मुदत
तारण ही मग जातं बुडीत
सत्य जेव्हा येतं समोर
आत्मा तेव्हा नसतो कुडीत
--- लबाड बोका
जन्म घेतो जीव जेव्हा
जन्माबरोबर जन्मते मरण
हजारो कारणं वाटतात पण
जन्मच असते मरणाचे कारण
मरण्यासाठीच करतो देह
अमर आत्म्याला धारण
आत्माच असतो देहाच्या
जगण्याला तारण
कधीतरी मग संपते मुदत
तारण ही मग जातं बुडीत
सत्य जेव्हा येतं समोर
आत्मा तेव्हा नसतो कुडीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा