२०६. कनिष्ठ
उठता बसता घेतात ते
देवाचं मुखी नाव
देव देव करतात पण
मनात नसतो भाव
नुसतं नाव जपण्यातच
वाटतं त्यांना धन्य
नामजपाच्या नावाखाली
झाकू पहातात वैगुण्य
देवाचं नाव जपून ते
बनू पहातात श्रेष्ठ
खोटी असते धडपड त्यांची
ते कनिष्ठाहून कनिष्ठ
--- लबाड बोका
उठता बसता घेतात ते
देवाचं मुखी नाव
देव देव करतात पण
मनात नसतो भाव
नुसतं नाव जपण्यातच
वाटतं त्यांना धन्य
नामजपाच्या नावाखाली
झाकू पहातात वैगुण्य
देवाचं नाव जपून ते
बनू पहातात श्रेष्ठ
खोटी असते धडपड त्यांची
ते कनिष्ठाहून कनिष्ठ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा