२०७. सामंजस्य
माणूस म्हणून मी वागेन
माणूस म्हणून तू वाग
माणसासारखं वागून आपण
माणुसकीला आणू जाग
एक पाऊल मी टाकेन
एक पाऊल तू टाक
हळू हळू येऊन जवळ
जाळून करू द्वेष खाक
प्रेम तुझ्यावर मी करेन
प्रेम माझ्यावर तू कर
प्रेमानेच जिंकू मनं
प्रेमाचीच घालून भर
--- लबाड बोका
माणूस म्हणून मी वागेन
माणूस म्हणून तू वाग
माणसासारखं वागून आपण
माणुसकीला आणू जाग
एक पाऊल मी टाकेन
एक पाऊल तू टाक
हळू हळू येऊन जवळ
जाळून करू द्वेष खाक
प्रेम तुझ्यावर मी करेन
प्रेम माझ्यावर तू कर
प्रेमानेच जिंकू मनं
प्रेमाचीच घालून भर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा