२२६. दुग्ध शर्करा योग
दूध घेते सामावून
साखरेला आपल्या आत
साखरही घेते स्वत:ला
विरघळवून त्या दूधात
अस्तित्व हरवते साखरेचे
पण जात नाही स्वभाव
सशक्त करीत सर्वांना
दूधही पाडते प्रभाव
बदलत नाही रंग दूध
त्यागत नाही साखर गोडी
दुग्ध शर्करा योग नेहमी
करतो सर्वांवर कडी
--- लबाड बोका
दूध घेते सामावून
साखरेला आपल्या आत
साखरही घेते स्वत:ला
विरघळवून त्या दूधात
अस्तित्व हरवते साखरेचे
पण जात नाही स्वभाव
सशक्त करीत सर्वांना
दूधही पाडते प्रभाव
बदलत नाही रंग दूध
त्यागत नाही साखर गोडी
दुग्ध शर्करा योग नेहमी
करतो सर्वांवर कडी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा