२२५. लाच
होत नाहीत कामं सरळ
करावी लागते नाचानाच
मनस्तापही होतो आणि
जीवालाही लागते आच
सहन करावा लागतो मुकाट
सामान्य माणसालाच जाच
विरोध करणाऱ्याच्या जीवावर
आणली जाते मग टाच
नाइलाजाने द्यावे लागतात
वरती आणि पन्नास पाच
माणसांचं काय घेऊन बसलात
देवही खातो नवसाची लाच
--- लबाड बोका
होत नाहीत कामं सरळ
करावी लागते नाचानाच
मनस्तापही होतो आणि
जीवालाही लागते आच
सहन करावा लागतो मुकाट
सामान्य माणसालाच जाच
विरोध करणाऱ्याच्या जीवावर
आणली जाते मग टाच
नाइलाजाने द्यावे लागतात
वरती आणि पन्नास पाच
माणसांचं काय घेऊन बसलात
देवही खातो नवसाची लाच
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा