२२७. सामान्य माणूस
सामान्य माणसाची
सामान्य स्वप्नं
कुणालातरी भिऊन
स्वप्नातही लपणं
सामान्य माणसाची
सामान्य इच्छा
पुरवू नये कोणी
कधी आपला पिच्छा
सामान्य माणसाचे
सामान्य विचार
खांदा द्यायला तरी
मिळावेत कोणी चार
सामान्य माणसाची
सामान्य उडी
फार फार तर घेईल
एखादी जास्त जुडी
सामान्य माणसाची
सामान्य झेप
जमलं तर मारील
फुकटची खेप
सामान्य माणसाची
सामान्य पोच
सतत लागते
कसलीतरी बोच
सामान्य माणसाची
सामान्य अक्कल
तरी ही पडते
लवकर टक्कल
सामान्य माणसाचा
सामान्य वकुब
बायकोच्याच कुशीची
भरपूर होते ऊब
सामान्य माणसाचा
सामान्य आब
बायको पोरांवर
करतो रुबाब
सामान्य माणसाचं
सामान्यच सगळं
अंडरवेअरलाही
लावतो ठिगळं
--- लबाड बोका
सामान्य माणसाची
सामान्य स्वप्नं
कुणालातरी भिऊन
स्वप्नातही लपणं
सामान्य माणसाची
सामान्य इच्छा
पुरवू नये कोणी
कधी आपला पिच्छा
सामान्य माणसाचे
सामान्य विचार
खांदा द्यायला तरी
मिळावेत कोणी चार
सामान्य माणसाची
सामान्य उडी
फार फार तर घेईल
एखादी जास्त जुडी
सामान्य माणसाची
सामान्य झेप
जमलं तर मारील
फुकटची खेप
सामान्य माणसाची
सामान्य पोच
सतत लागते
कसलीतरी बोच
सामान्य माणसाची
सामान्य अक्कल
तरी ही पडते
लवकर टक्कल
सामान्य माणसाचा
सामान्य वकुब
बायकोच्याच कुशीची
भरपूर होते ऊब
सामान्य माणसाचा
सामान्य आब
बायको पोरांवर
करतो रुबाब
सामान्य माणसाचं
सामान्यच सगळं
अंडरवेअरलाही
लावतो ठिगळं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा