२२४. पवित्र ?
देव दर्शनाला जावं लागतं
आंघोळ करूनच गाभाऱ्यात
देवही असतो अडकलेला
रूढींच्या या फाफट पसाऱ्यात
आंघोळ करून करून फारतर
करता येईल शरीर साफ
पण कसं साफ करता येईल
मनात असलेलं पाप
रजस्वला स्त्री म्हणे
असते एकदम अपवित्र
करू नये तिने पूजा
सांगतं असं धर्मशास्त्र
देवाच्या दर्शनासाठी म्हणे
आंघोळ करून व्हा पवित्र
आंघोळ करून दर्शन घेताना
पोटातच असतं मलमूत्र
--- लबाड बोका
देव दर्शनाला जावं लागतं
आंघोळ करूनच गाभाऱ्यात
देवही असतो अडकलेला
रूढींच्या या फाफट पसाऱ्यात
आंघोळ करून करून फारतर
करता येईल शरीर साफ
पण कसं साफ करता येईल
मनात असलेलं पाप
रजस्वला स्त्री म्हणे
असते एकदम अपवित्र
करू नये तिने पूजा
सांगतं असं धर्मशास्त्र
देवाच्या दर्शनासाठी म्हणे
आंघोळ करून व्हा पवित्र
आंघोळ करून दर्शन घेताना
पोटातच असतं मलमूत्र
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा