२१२. अवतार
मंथनामधलं पिऊन अमृत
देव झालेत अमर
गेलेत कुठे तोंड घेऊन
शोधतोय मी पामर
सांगत नाहीत ठावठिकाणा
कुठे त्यांचा स्वर्ग
कलीयुगाच्या गुणावगुणांचा
झालाय वाटतं संसर्ग
वाट तरी पाहू किती
पहावत नाही अत्याचार
मीच होतो देव आता
आणि घेतो अवतार
--- लबाड बोका
मंथनामधलं पिऊन अमृत
देव झालेत अमर
गेलेत कुठे तोंड घेऊन
शोधतोय मी पामर
सांगत नाहीत ठावठिकाणा
कुठे त्यांचा स्वर्ग
कलीयुगाच्या गुणावगुणांचा
झालाय वाटतं संसर्ग
वाट तरी पाहू किती
पहावत नाही अत्याचार
मीच होतो देव आता
आणि घेतो अवतार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा