२२०. खोटे लोक
एक वकील दुसरा डॉक्टर
दोन्ही लोक असतात खोटे
निरूपाय होऊन मारावे लागतात
वारंवार त्यांच्याकडेच खेटे
अशा खोट्या लोकांकडे जाऊन
सांगावे लागते सगळे खरे
गाय गेली कसायाकडे
काय तिचे होईल बरे
क्वचित एखादा असतो चांगला
पण तो असतो अपवाद फक्त
इतर सगळे असतात टपून
घटाघट पिण्यासाठी रक्त
संकटात सापडलेली माणसं
समजत असतात त्यांना देव
ते हसतात मनापासून
आली म्हणतात धनाची ठेव
साधी भोळी गरीब माणसं
कळत नाही त्यांना काही
लोकांना लुटून लुबाडून मात्र
ते जगतात जीवन शाही
काय उपयोग शिकून एवढं
धरतात फक्त पैशाचा लोभ
मारही खातात मग कधी
जेव्हा होतो लोकांचा क्षोभ
--- लबाड बोका
एक वकील दुसरा डॉक्टर
दोन्ही लोक असतात खोटे
निरूपाय होऊन मारावे लागतात
वारंवार त्यांच्याकडेच खेटे
अशा खोट्या लोकांकडे जाऊन
सांगावे लागते सगळे खरे
गाय गेली कसायाकडे
काय तिचे होईल बरे
क्वचित एखादा असतो चांगला
पण तो असतो अपवाद फक्त
इतर सगळे असतात टपून
घटाघट पिण्यासाठी रक्त
संकटात सापडलेली माणसं
समजत असतात त्यांना देव
ते हसतात मनापासून
आली म्हणतात धनाची ठेव
साधी भोळी गरीब माणसं
कळत नाही त्यांना काही
लोकांना लुटून लुबाडून मात्र
ते जगतात जीवन शाही
काय उपयोग शिकून एवढं
धरतात फक्त पैशाचा लोभ
मारही खातात मग कधी
जेव्हा होतो लोकांचा क्षोभ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा