२१९. फुकाचे तत्त्वज्ञान
दाणाही तोच देईल म्हणतात
ज्याने दिलीय खायला चोच
असं होत नाही म्हणून
कित्येक मरतात उपाशी रोज
कित्येक मरतात कुपोषणाने
कित्येक जातात भूकबळी
दाणा तर राहिलाच दूर
पाणीही लागत नाही गळी
झालं असतं का मग असं
दाणा देणारा असता जर
फुकाचे तत्त्वज्ञान आहे सारे
द्या लक्ष तथ्यावर
--- लबाड बोका
दाणाही तोच देईल म्हणतात
ज्याने दिलीय खायला चोच
असं होत नाही म्हणून
कित्येक मरतात उपाशी रोज
कित्येक मरतात कुपोषणाने
कित्येक जातात भूकबळी
दाणा तर राहिलाच दूर
पाणीही लागत नाही गळी
झालं असतं का मग असं
दाणा देणारा असता जर
फुकाचे तत्त्वज्ञान आहे सारे
द्या लक्ष तथ्यावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा