२२१. लबाड
कोणाला ना कोणालातरी
नेहमी मी घालतो टोपी
उडते त्यांची झोप पण
मी जातो गाढ झोपी
कळतं त्यांना जेव्हा केव्हा
झालेला असतो उशीर
लबाड बोक्याने केलेला असतो
त्यांचा एक उंदीर
देतात मला शिव्या आणि
करतात उद्धार माझा
काय फरक पडतो मला
विकून खाल्यात लाजा
मोडतात मग कडाकडा
माझ्या नावाने बोटं
हात चोळीत बसतात म्हणतात
आपलंच नशिब खोटं
देवही करतो मदत मला
त्यालाही देतो घबाड
मी तर आहेच लबाड पण
देवही माझा लबाड
--- लबाड बोका
कोणाला ना कोणालातरी
नेहमी मी घालतो टोपी
उडते त्यांची झोप पण
मी जातो गाढ झोपी
कळतं त्यांना जेव्हा केव्हा
झालेला असतो उशीर
लबाड बोक्याने केलेला असतो
त्यांचा एक उंदीर
देतात मला शिव्या आणि
करतात उद्धार माझा
काय फरक पडतो मला
विकून खाल्यात लाजा
मोडतात मग कडाकडा
माझ्या नावाने बोटं
हात चोळीत बसतात म्हणतात
आपलंच नशिब खोटं
देवही करतो मदत मला
त्यालाही देतो घबाड
मी तर आहेच लबाड पण
देवही माझा लबाड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा