२१५. ते म्हणून तुम्ही
ते पडतात पाया म्हणून
तुम्ही सुद्धा पडा पाया
ते देतात बांग तर
का लाजता आरती गाया
ते देतात धर्म शिक्षण
तुम्ही उघडा वेद शाळा
ते जाळतात शाळा म्हणून
तुम्ही देखील जाळा शाळा
ते नाकारतात स्त्री स्वातंत्र्य
तुम्ही करा स्त्रीचा छळ
आई, बहीण, बायको, मुलगी
ओकून टाका सगळी मळमळ
ते झालेत कट्टर म्हणून
तुम्ही सुद्धा व्हा कट्टर
संत, शिवराय आणि सावरकर
वायाच गेले म्हणायचे खरंतर
--- लबाड बोका
ते पडतात पाया म्हणून
तुम्ही सुद्धा पडा पाया
ते देतात बांग तर
का लाजता आरती गाया
ते देतात धर्म शिक्षण
तुम्ही उघडा वेद शाळा
ते जाळतात शाळा म्हणून
तुम्ही देखील जाळा शाळा
ते नाकारतात स्त्री स्वातंत्र्य
तुम्ही करा स्त्रीचा छळ
आई, बहीण, बायको, मुलगी
ओकून टाका सगळी मळमळ
ते झालेत कट्टर म्हणून
तुम्ही सुद्धा व्हा कट्टर
संत, शिवराय आणि सावरकर
वायाच गेले म्हणायचे खरंतर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा