२१७. सापेक्ष
सभ्यतेच्या बुरख्याआड
लपून बसतात हरामखोर
पकडला जात नाही तोपर्यंत
चोर सुद्धा नसतो चोर
वाईट करण्यासाठी सुद्धा
दिला जातो देवाला जाप
योग्य कारणासाठी केलं तर
पाप सुद्धा नसतं पाप
समाजामध्ये वावरताना
वागावं लागतं नेहमी श्लील
बंद दाराआड केला तर
संभोग सुद्धा नसतो अश्लील
काळ जसा बदलतो तसे
संदर्भ सुद्धा असतात वेगळे
योग्य काय नी अयोग्य काय
सापेक्षच तर असते सगळे
--- लबाड बोका
सभ्यतेच्या बुरख्याआड
लपून बसतात हरामखोर
पकडला जात नाही तोपर्यंत
चोर सुद्धा नसतो चोर
वाईट करण्यासाठी सुद्धा
दिला जातो देवाला जाप
योग्य कारणासाठी केलं तर
पाप सुद्धा नसतं पाप
समाजामध्ये वावरताना
वागावं लागतं नेहमी श्लील
बंद दाराआड केला तर
संभोग सुद्धा नसतो अश्लील
काळ जसा बदलतो तसे
संदर्भ सुद्धा असतात वेगळे
योग्य काय नी अयोग्य काय
सापेक्षच तर असते सगळे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा