१९५. उपकार
मनात येतात विचार वाईट
घेतात विवेकाचा ग्रास
शरीराने खाल्ली उचल तर
सगळ्यांनाच होईल त्रास
आळशी आहे मी म्हणून
बसतो नुसताच विचार करत
नाहीतर अख्ख्या जगाचेच
दिवस आले असते भरत
आधीच आहेत माथेफिरू खूप
त्यांनीच उडवलाय हाहाकार
शांत राहून एक प्रकारे
करतोय मी सगळ्यांवर उपकार
--- लबाड बोका
मनात येतात विचार वाईट
घेतात विवेकाचा ग्रास
शरीराने खाल्ली उचल तर
सगळ्यांनाच होईल त्रास
आळशी आहे मी म्हणून
बसतो नुसताच विचार करत
नाहीतर अख्ख्या जगाचेच
दिवस आले असते भरत
आधीच आहेत माथेफिरू खूप
त्यांनीच उडवलाय हाहाकार
शांत राहून एक प्रकारे
करतोय मी सगळ्यांवर उपकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा