१९४. अवघड
अवचित एकदा भेटला तो
म्हणाला मीच आहे देव
मी म्हणालो तुझ्यासारख्यांचं
खूपच फुटलंय पेव
अविश्वास माझा बघून तो
पावला क्षणात अंतर्धान
पुन्हा प्रकट होत त्याने
धरला माझा कान
माफी त्याची मागून म्हणालो
कृपा करा देवा
तुमच्या भक्तांच्या उद्धाराचा
मार्ग मला दावा
दगड हातात देऊन म्हणाला
ऐक देऊन लक्ष
घाल माझ्या भक्तांच्या कपाळात
मिळेल त्यांना मोक्ष
तेव्हा पासून फिरतो आहे
घेऊन तोच दगड
भेटत नाही खरा भक्त
झालंय सारंच अवघड
--- लबाड बोका
अवचित एकदा भेटला तो
म्हणाला मीच आहे देव
मी म्हणालो तुझ्यासारख्यांचं
खूपच फुटलंय पेव
अविश्वास माझा बघून तो
पावला क्षणात अंतर्धान
पुन्हा प्रकट होत त्याने
धरला माझा कान
माफी त्याची मागून म्हणालो
कृपा करा देवा
तुमच्या भक्तांच्या उद्धाराचा
मार्ग मला दावा
दगड हातात देऊन म्हणाला
ऐक देऊन लक्ष
घाल माझ्या भक्तांच्या कपाळात
मिळेल त्यांना मोक्ष
तेव्हा पासून फिरतो आहे
घेऊन तोच दगड
भेटत नाही खरा भक्त
झालंय सारंच अवघड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा