१९१. शोध देवाचा
शोधत असतात कुणी कुणी
इथे तिथे देव
हरवली आहे जणू काही
बापजाद्यांची ठेव
शोधून शोधून थकतात आणि
होतात मग भ्रमिष्ट
तेव्हाच होतो साक्षात्कार
म्हणतात आम्हीच श्रेष्ठ
देव भेटतो त्यांना
त्यांचा वकुब जेवढा
देव त्यांचा केवढा
त्यांच्याच डोक्याएवढा
--- लबाड बोका
शोधत असतात कुणी कुणी
इथे तिथे देव
हरवली आहे जणू काही
बापजाद्यांची ठेव
शोधून शोधून थकतात आणि
होतात मग भ्रमिष्ट
तेव्हाच होतो साक्षात्कार
म्हणतात आम्हीच श्रेष्ठ
देव भेटतो त्यांना
त्यांचा वकुब जेवढा
देव त्यांचा केवढा
त्यांच्याच डोक्याएवढा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा