१९२. दुर्दैव
विजेवरच्या दिव्यांनी
दिवस केलाय रातीचा
देवासमोर हवाच असतो
दिवा अजूनही वातीचा
करतं कोणी रक्षण देवाचंच
करून कोट छातीचा
तरी चुकत नाही फेरा
देवालाही साडेसातीचा
एवढा मोठ्ठा देव सुद्धा
असतो दगडामातीचा
भक्त श्रेष्ठ असून संत
उरतो त्याच्याच जातीचा
--- लबाड बोका
विजेवरच्या दिव्यांनी
दिवस केलाय रातीचा
देवासमोर हवाच असतो
दिवा अजूनही वातीचा
करतं कोणी रक्षण देवाचंच
करून कोट छातीचा
तरी चुकत नाही फेरा
देवालाही साडेसातीचा
एवढा मोठ्ठा देव सुद्धा
असतो दगडामातीचा
भक्त श्रेष्ठ असून संत
उरतो त्याच्याच जातीचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा