२०९. विलक्षण
दिपतील तारे तांबूस मोले
चंद्र चांदणे गगन नभावर
शुभाशुभाचे घालून शिंपण
लखलखणारे तेज प्रभावर
संध्याछाया भोग मनाचे
उसवून पुन्हा आणिक लक्तर
थेंब दवाचे भरल्या पाणी
साहील फक्तच दुर्गम प्रस्तर
कर्मफलाचे मांडून प्राक्तन
अनाम अंतिम लक्षण खडतर
या देहाचे जाळून अस्तर
वाहीन थोडी हळद पिंजर
--- लबाड बोका
दिपतील तारे तांबूस मोले
चंद्र चांदणे गगन नभावर
शुभाशुभाचे घालून शिंपण
लखलखणारे तेज प्रभावर
संध्याछाया भोग मनाचे
उसवून पुन्हा आणिक लक्तर
थेंब दवाचे भरल्या पाणी
साहील फक्तच दुर्गम प्रस्तर
कर्मफलाचे मांडून प्राक्तन
अनाम अंतिम लक्षण खडतर
या देहाचे जाळून अस्तर
वाहीन थोडी हळद पिंजर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा