१८८. ऊर्जा
पहाट समयी कानी पडतो
पक्ष्यांचा मंजुळ सुस्वर
निसर्ग रूपात भेटतो मला
माझा निर्गुण ईश्वर
उघडतो मी दारं खिडक्या
पडतो घराबाहेर
सुंदर नाजुक रंग फुलांचा
मिळतो मला अहेर
पूर्वेच्या क्षितिजावरती
उगवतं सूर्यबिंब
कोवळ्या तांबूस किरणांत मी
न्हाऊन निघतो चिंब
मिळते मला नवी उभारी
होतो पुन्हा मी ताजा
निसर्गातूनच मिळते मला
रोज नवी ऊर्जा
--- लबाड बोका
पहाट समयी कानी पडतो
पक्ष्यांचा मंजुळ सुस्वर
निसर्ग रूपात भेटतो मला
माझा निर्गुण ईश्वर
उघडतो मी दारं खिडक्या
पडतो घराबाहेर
सुंदर नाजुक रंग फुलांचा
मिळतो मला अहेर
पूर्वेच्या क्षितिजावरती
उगवतं सूर्यबिंब
कोवळ्या तांबूस किरणांत मी
न्हाऊन निघतो चिंब
मिळते मला नवी उभारी
होतो पुन्हा मी ताजा
निसर्गातूनच मिळते मला
रोज नवी ऊर्जा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा