२३४. काहीही
गोड जरी असली तरी
कोल्ह्याला असतात द्राक्षं आंबट
कोल्हा असतो काकडीला राजी
काकडी असू दे कितीही लांबट
मिट्ट काळोख असला तरी
चोराच्या मनात असतं चांदणं
म्हणून करतो चोर चोरी
काळोखात त्याला दिसतं चांगलं
ज्याचं जसं कर्म तसं
फळ देतो म्हणे तो ईश्वर
कसेही असले पाच तरी
पाचांमुखी असतो परमेश्वर
--- लबाड बोका
गोड जरी असली तरी
कोल्ह्याला असतात द्राक्षं आंबट
कोल्हा असतो काकडीला राजी
काकडी असू दे कितीही लांबट
मिट्ट काळोख असला तरी
चोराच्या मनात असतं चांदणं
म्हणून करतो चोर चोरी
काळोखात त्याला दिसतं चांगलं
ज्याचं जसं कर्म तसं
फळ देतो म्हणे तो ईश्वर
कसेही असले पाच तरी
पाचांमुखी असतो परमेश्वर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा