२३५. कौल
नक्कीच असतं फूल सुंदर
त्या सौंदर्याचीच पडते भूल
उपेक्षायचं नसतं कळी म्हणून
त्या कळीचंच होतं फूल
कोणी कितीही होवो मोठा
पांघरू दे कसलीही झूल
दडलेलं असतं प्रत्येकामध्ये
एक निरागस लहान मूल
तेच असतं जोपासायचं
त्याचीच घ्यायची असते चाहूल
तेच पडू देत नाही
आयुष्यात वाकडं पाऊल
जेव्हा वाटतं पाप करतोय
त्याचाच घ्यायचा असतो कौल
तेच बिघडू देत नाही
आपल्या निर्णयाचा डौल
--- लबाड बोका
नक्कीच असतं फूल सुंदर
त्या सौंदर्याचीच पडते भूल
उपेक्षायचं नसतं कळी म्हणून
त्या कळीचंच होतं फूल
कोणी कितीही होवो मोठा
पांघरू दे कसलीही झूल
दडलेलं असतं प्रत्येकामध्ये
एक निरागस लहान मूल
तेच असतं जोपासायचं
त्याचीच घ्यायची असते चाहूल
तेच पडू देत नाही
आयुष्यात वाकडं पाऊल
जेव्हा वाटतं पाप करतोय
त्याचाच घ्यायचा असतो कौल
तेच बिघडू देत नाही
आपल्या निर्णयाचा डौल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा