२३३. विदेह
नकोच आता छत्र छायेचे
नकोच आता भोग कायेचे
योगही नाही उरला आता
नकोच बंधन मोह मायेचे
आसक्ती ची नकोच सक्ती
सक्ती ची ही नकोच भक्ती
उरली एकच आस ती आता
भेटावी ती अमूर्त शक्ती
विरक्त मनाचे विरक्त दर्शन
नजर लागली पैलतीरावर
सुटले संचित सुटले आर्तव
देह राहिला ऐलतीरावर
--- लबाड बोका
नकोच आता छत्र छायेचे
नकोच आता भोग कायेचे
योगही नाही उरला आता
नकोच बंधन मोह मायेचे
आसक्ती ची नकोच सक्ती
सक्ती ची ही नकोच भक्ती
उरली एकच आस ती आता
भेटावी ती अमूर्त शक्ती
विरक्त मनाचे विरक्त दर्शन
नजर लागली पैलतीरावर
सुटले संचित सुटले आर्तव
देह राहिला ऐलतीरावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा