२३०. सांगोवांगी ( सांगोवानगी )
निघून जातो आत्मा
देह सोडून मेल्यानंतर
कधी मिळते मुक्ती त्याला
कधी भटकतो निरंतर
कधी अडकतो आत्मा म्हणे
जन्म मृत्यूच्या फेऱ्यात
शिक्षाच म्हणजे त्याला ती
जगू नका तोऱ्यात
कुणी जातं स्वर्गात तर
कुणी जातं नरकात
भोगायचे असतात भोग म्हणे
पाप पुण्याच्या फरकात
खरंच होतं का असं
कुणालाच माहित नाही
आहे सगळी सांगोवांगी
पुरावा नाही काही
--- लबाड बोका
निघून जातो आत्मा
देह सोडून मेल्यानंतर
कधी मिळते मुक्ती त्याला
कधी भटकतो निरंतर
कधी अडकतो आत्मा म्हणे
जन्म मृत्यूच्या फेऱ्यात
शिक्षाच म्हणजे त्याला ती
जगू नका तोऱ्यात
कुणी जातं स्वर्गात तर
कुणी जातं नरकात
भोगायचे असतात भोग म्हणे
पाप पुण्याच्या फरकात
खरंच होतं का असं
कुणालाच माहित नाही
आहे सगळी सांगोवांगी
पुरावा नाही काही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा