२३१. लग्न
लग्न म्हणजे असतं मिलन
दोन जीवांचं दोन मनांचं
प्रकृतीतल्या आदिम आणि
मुलभूत अशा दोन कणांचं
लग्न म्हणजे असतात खरंतर
अनेक गरजा माणसांच्या
कधी शारीरिक कधी मानसिक
कौटुंबिक सामाजिक कारणांच्या
लग्न म्हणजे असतो विधी
सर्वांना सोयीचा असलेला
देतो पावित्र्य प्राप्त करून
समाजात विषय वासनेला
--- लबाड बोका
लग्न म्हणजे असतं मिलन
दोन जीवांचं दोन मनांचं
प्रकृतीतल्या आदिम आणि
मुलभूत अशा दोन कणांचं
लग्न म्हणजे असतात खरंतर
अनेक गरजा माणसांच्या
कधी शारीरिक कधी मानसिक
कौटुंबिक सामाजिक कारणांच्या
लग्न म्हणजे असतो विधी
सर्वांना सोयीचा असलेला
देतो पावित्र्य प्राप्त करून
समाजात विषय वासनेला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा