२३७. लक्ष्मण रेषा
जाणवलंय मला कधीच
आवडतो मी तुला
तरीही ठेवला संयम मी
भुललो नाही फुला
आवडतेस मलाही तू
आहेस तशी तू चांगली
आहे मला लाज अजून
वेशीवर नाही टांगली
नकोस करू प्रेम माझ्यावर
नकोस लावू जीव
आहेस तू गं संसारी
नकोस ओलांडू शीव
--- लबाड बोका
जाणवलंय मला कधीच
आवडतो मी तुला
तरीही ठेवला संयम मी
भुललो नाही फुला
आवडतेस मलाही तू
आहेस तशी तू चांगली
आहे मला लाज अजून
वेशीवर नाही टांगली
नकोस करू प्रेम माझ्यावर
नकोस लावू जीव
आहेस तू गं संसारी
नकोस ओलांडू शीव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा