२३८. ध्येय
स्वप्नं बघतो शिवरायांची
आणि खातो मनात मांडे
चव्हाण, पवार, देशमुख, शिंदे
असले पदरात पडतात धोंडे
ठाकरे आणि ठाकरे बंधू
स्वप्नं दाखवतात मराठेशाहीची
करतात नाटकं मतांसाठी
तळमळ नसते कार्यवाहीची
साम्यवाद नुसता नावापुरता
माणसं त्यांना वाटतात यंत्र
जे असतात जास्त समान
तेच भोगतात सत्तातंत्र
अल्पसंख्यांक आणि हिंदुत्ववादी
जातीधर्मावर मागतात मते
कॉंग्रेस तर नेहमीच नेहमी
विकतच्या मतांवर निवडून येते
फसणार नाही मुळीच आता
उलथवून टाकीन लोकशाही
हवी आहे आता मला
फक्त माझीच हुकूमशाही
--- लबाड बोका
स्वप्नं बघतो शिवरायांची
आणि खातो मनात मांडे
चव्हाण, पवार, देशमुख, शिंदे
असले पदरात पडतात धोंडे
ठाकरे आणि ठाकरे बंधू
स्वप्नं दाखवतात मराठेशाहीची
करतात नाटकं मतांसाठी
तळमळ नसते कार्यवाहीची
साम्यवाद नुसता नावापुरता
माणसं त्यांना वाटतात यंत्र
जे असतात जास्त समान
तेच भोगतात सत्तातंत्र
अल्पसंख्यांक आणि हिंदुत्ववादी
जातीधर्मावर मागतात मते
कॉंग्रेस तर नेहमीच नेहमी
विकतच्या मतांवर निवडून येते
फसणार नाही मुळीच आता
उलथवून टाकीन लोकशाही
हवी आहे आता मला
फक्त माझीच हुकूमशाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा