२४१. मी
आहे मी सर्व गुण संपन्न
पण नशिब नाही मला वश
करतो किती प्रयत्न तरी
मिळत नाही कशात यश
सगळे हिणवतात अपयशी म्हणून
वाईट खूप वाटतं मला
भरू शकत नाही पोट स्वत:चं
अंगात असून अनेक कला
माणूस म्हणून मी आहे चांगला
त्याचा मला वाटतो गर्व
पण हे ही कळून चुकलंय मला
आहे मी एक शापित गंधर्व
--- लबाड बोका
आहे मी सर्व गुण संपन्न
पण नशिब नाही मला वश
करतो किती प्रयत्न तरी
मिळत नाही कशात यश
सगळे हिणवतात अपयशी म्हणून
वाईट खूप वाटतं मला
भरू शकत नाही पोट स्वत:चं
अंगात असून अनेक कला
माणूस म्हणून मी आहे चांगला
त्याचा मला वाटतो गर्व
पण हे ही कळून चुकलंय मला
आहे मी एक शापित गंधर्व
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा