२४२. दैवी
कविता म्हणजे असतो
शब्द फुलांचा हार
एखाद्या मोठ्या गोष्टीचं
थोडक्यात असतं सार
कशी ते माहित नाही
पण उर्मी येते आतून
तेव्हाच जन्मते कविता
लिहून होते हातून
आहे हे काहीतरी वेगळं
म्हणतात त्याला दैवी
जमत नाही कोणालाही
प्रयत्न करूनही एरवी
--- लबाड बोका
कविता म्हणजे असतो
शब्द फुलांचा हार
एखाद्या मोठ्या गोष्टीचं
थोडक्यात असतं सार
कशी ते माहित नाही
पण उर्मी येते आतून
तेव्हाच जन्मते कविता
लिहून होते हातून
आहे हे काहीतरी वेगळं
म्हणतात त्याला दैवी
जमत नाही कोणालाही
प्रयत्न करूनही एरवी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा