२४५. वंश विच्छेद
सगळ्याजणांची एकच इच्छा
मुलगी नको मुलगा हवा
संस्कृतीच सांगते आमची
मुलगा असतो वंशाचा दिवा
चुकून जन्मली मुलगी तर
चिंता पोखरते तन आणि मन
परंपराच सांगते आमची
मुलगी असते परक्याचं धन
काहींना मारतात जन्मानंतर
काहींना मारतात गर्भातच
कसा पेटेल दिवा वंशाचा
विझवून टाकली जर वातच
--- लबाड बोका
सगळ्याजणांची एकच इच्छा
मुलगी नको मुलगा हवा
संस्कृतीच सांगते आमची
मुलगा असतो वंशाचा दिवा
चुकून जन्मली मुलगी तर
चिंता पोखरते तन आणि मन
परंपराच सांगते आमची
मुलगी असते परक्याचं धन
काहींना मारतात जन्मानंतर
काहींना मारतात गर्भातच
कसा पेटेल दिवा वंशाचा
विझवून टाकली जर वातच
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा