२४६. तृप्त
मागच्या आपोआप होतात शहाण्या
पुढच्यांस जेव्हा बसते ठोकर
अतिशहाण्यांचा बैल रिकामा
मुंगी होऊन खावी साखर
साखरेचे खाणाऱ्यांना देव देणार
पण खाई त्यांना खवखवे
खाणाऱ्या तरी खात असतात
मार्ग शोधतात नवनवे
कधी होते उपरती पण
पुन्हा ये रे माझ्या मागल्या
करून करून भागल्या आणि
देवपूजेला लागल्या
--- लबाड बोका
मागच्या आपोआप होतात शहाण्या
पुढच्यांस जेव्हा बसते ठोकर
अतिशहाण्यांचा बैल रिकामा
मुंगी होऊन खावी साखर
साखरेचे खाणाऱ्यांना देव देणार
पण खाई त्यांना खवखवे
खाणाऱ्या तरी खात असतात
मार्ग शोधतात नवनवे
कधी होते उपरती पण
पुन्हा ये रे माझ्या मागल्या
करून करून भागल्या आणि
देवपूजेला लागल्या
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा