२५२. सुंदर आयुष्यासाठी
पुरावे नष्ट केले म्हणून
होत नाही पाप नष्ट
असतं ते तसंच मनात
जाणवत रहातं तिथून स्पष्ट
लागून रहाते टोचणी मनाला
अपराधी वाटत रहातं सारखं
अस्वस्थ व्हायला होतं आतून
मन सुखाला होतं पारखं
करायला हवा विचार म्हणून
चुकीचंच वागण्याअगोदर
होत नाही त्रास मग
आयुष्य सुद्धा होतं सुंदर
--- लबाड बोका
पुरावे नष्ट केले म्हणून
होत नाही पाप नष्ट
असतं ते तसंच मनात
जाणवत रहातं तिथून स्पष्ट
लागून रहाते टोचणी मनाला
अपराधी वाटत रहातं सारखं
अस्वस्थ व्हायला होतं आतून
मन सुखाला होतं पारखं
करायला हवा विचार म्हणून
चुकीचंच वागण्याअगोदर
होत नाही त्रास मग
आयुष्य सुद्धा होतं सुंदर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा