२५५. चैतन्य
ते असतं खडकामधून
पाझरणाऱ्या झऱ्यांत
ते असतं तसंच
वादळ आणि वाऱ्यांत
ते दिसतं मला
उसळणाऱ्या लाटांत
ते हसतं मला
फसवणाऱ्या वाटांत
ते असतं सुप्तावस्थेत
सुकलेल्याही बीजांत
ते असतं कडकडणाऱ्या
कोसळणाऱ्या वीजांत
ते असतं झाडांच्या
सळसळणाऱ्या पानांत
ते ऐकू येतं मला
संगीतातून कानांत
ते असतं कळीमधून
उमलणाऱ्या फुलांत
ते असतं आनंदाने
बागडणाऱ्या मुलांत
ते जाणवतं मला
सृष्टीच्या प्रत्येक कणात
तेच असतं चैतन्य
तुमच्या माझ्या मनात
--- लबाड बोका
ते असतं खडकामधून
पाझरणाऱ्या झऱ्यांत
ते असतं तसंच
वादळ आणि वाऱ्यांत
ते दिसतं मला
उसळणाऱ्या लाटांत
ते हसतं मला
फसवणाऱ्या वाटांत
ते असतं सुप्तावस्थेत
सुकलेल्याही बीजांत
ते असतं कडकडणाऱ्या
कोसळणाऱ्या वीजांत
ते असतं झाडांच्या
सळसळणाऱ्या पानांत
ते ऐकू येतं मला
संगीतातून कानांत
ते असतं कळीमधून
उमलणाऱ्या फुलांत
ते असतं आनंदाने
बागडणाऱ्या मुलांत
ते जाणवतं मला
सृष्टीच्या प्रत्येक कणात
तेच असतं चैतन्य
तुमच्या माझ्या मनात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा