२५६. आधार
पावलो पावली आठवतो तुला
परिस्थितीच असते तशी
हवं वाटतं भरवश्याचं कुणी
दुसरी कोणती शोधू कुशी
खूप वाटत असतं असहाय्य
गरज असते मदतीची
तेव्हा करतो धावा तुझा
अपेक्षा करतो प्रचितीची
माहित नाही आहेस का तू
दिसत नाहीस कधीच कोणाला
तरी सुद्धा प्रत्येक वेळी
तुझाच आधार वाटतो मला
--- लबाड बोका
पावलो पावली आठवतो तुला
परिस्थितीच असते तशी
हवं वाटतं भरवश्याचं कुणी
दुसरी कोणती शोधू कुशी
खूप वाटत असतं असहाय्य
गरज असते मदतीची
तेव्हा करतो धावा तुझा
अपेक्षा करतो प्रचितीची
माहित नाही आहेस का तू
दिसत नाहीस कधीच कोणाला
तरी सुद्धा प्रत्येक वेळी
तुझाच आधार वाटतो मला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा