२५७. विषण्ण
आठवणींच्या उजेडात शोधतोय
भूतकाळातले काही कण
काही काही सापडतात अन्
काही गेले कायमचे पण
वय वाढत चाललंय आता
थकत चाललंय सारं तन
रमवू पहातोय आठवणींत
कोसळणारं थकलं मन
आठवतंय थोडं थोडं
निर्मळ निरागस बालपण
गेलेत विखरून केव्हाचे
तेव्हाचे ते सर्वचजण
जगू पहातोय तारुण्यातले
हुरहुरणारे हळवे क्षण
अजून आहे शिल्लक काही
खोल कुठेतरी हिरवेपण
जेवढ्या राहील्यात शिल्लक स्मृती
त्याही जातील अशाच विरून
कसा जगू त्यांच्याशिवाय
आताच जातंय काळीज चिरून
--- लबाड बोका
आठवणींच्या उजेडात शोधतोय
भूतकाळातले काही कण
काही काही सापडतात अन्
काही गेले कायमचे पण
वय वाढत चाललंय आता
थकत चाललंय सारं तन
रमवू पहातोय आठवणींत
कोसळणारं थकलं मन
आठवतंय थोडं थोडं
निर्मळ निरागस बालपण
गेलेत विखरून केव्हाचे
तेव्हाचे ते सर्वचजण
जगू पहातोय तारुण्यातले
हुरहुरणारे हळवे क्षण
अजून आहे शिल्लक काही
खोल कुठेतरी हिरवेपण
जेवढ्या राहील्यात शिल्लक स्मृती
त्याही जातील अशाच विरून
कसा जगू त्यांच्याशिवाय
आताच जातंय काळीज चिरून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा