२५८. शेवटचा निरोप
फोटो तुझा पहात बसतो
नुसतेच टाकतो उसासे
असे कसे पडले उलटे
माझ्या नशिबाचे फासे
कळून चुकलंय आता मला
होणार नाहीस माझी तू
काहीच उरली नाही आशा
मनात सुद्धा नाही किंतू
नको वाटतं जगणं आता
त्यापेक्षा मरण बरं
सगळं संपून गेलंय सखे
हेच मानलं पाहिजे खरं
का अशी ही ताटातूट
तुझं सुद्धा असून प्रेम
चाललो निघून कायमचा
शेवटचा हा निरोप सप्रेम
--- लबाड बोका
फोटो तुझा पहात बसतो
नुसतेच टाकतो उसासे
असे कसे पडले उलटे
माझ्या नशिबाचे फासे
कळून चुकलंय आता मला
होणार नाहीस माझी तू
काहीच उरली नाही आशा
मनात सुद्धा नाही किंतू
नको वाटतं जगणं आता
त्यापेक्षा मरण बरं
सगळं संपून गेलंय सखे
हेच मानलं पाहिजे खरं
का अशी ही ताटातूट
तुझं सुद्धा असून प्रेम
चाललो निघून कायमचा
शेवटचा हा निरोप सप्रेम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा