२५९. दारं उघडा बयांनो
कोण पुरूष कसा वागेल
सांगता येत नाही कधी
कोणी कितीही भासेल सभ्य
मनात त्याच्या असते मादी
संधी जेव्हा मिळते तेव्हा
उफाळून येते ही विकृती
कसले आलेत संस्कार अन्
कसली आलीय संस्कृती
परंपरेतच आहेत बीजे
पुरूषप्रधान व्यवस्थेची
कोणालाच नाही खरी काळजी
स्त्रीच्या ह्या अवस्थेची
गरज आहे घालण्याची
मुळावरच खरंतर घाव
आदिमायांनो आदिशक्तींनो
तुम्हीच पाडा हाणून डाव
--- लबाड बोका
कोण पुरूष कसा वागेल
सांगता येत नाही कधी
कोणी कितीही भासेल सभ्य
मनात त्याच्या असते मादी
संधी जेव्हा मिळते तेव्हा
उफाळून येते ही विकृती
कसले आलेत संस्कार अन्
कसली आलीय संस्कृती
परंपरेतच आहेत बीजे
पुरूषप्रधान व्यवस्थेची
कोणालाच नाही खरी काळजी
स्त्रीच्या ह्या अवस्थेची
गरज आहे घालण्याची
मुळावरच खरंतर घाव
आदिमायांनो आदिशक्तींनो
तुम्हीच पाडा हाणून डाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा