२६०. गुलाम
तेच स्वत: सांगतात मुलांना
आम्हाला पप्पा मम्मी म्हणा
आई बाबा म्हणवून घ्यायला
वाटतो त्यांना कमीपणा
मराठी म्हणवून घ्यायची पण
वाटत असते त्यांना लाज
मराठीलाच नाकं मुरडायची
त्यांना असते भारी खाज
देवधर्म सुद्धा करतात
आता इंग्लीशमधून
नजर त्यांची फक्त सुखावर
जातात देवही सोडून
ते ही हिंदू मी ही हिंदू
करतात मला ख्रिसमस विश
ख्रिश्चनच व्हायचं राहिलंय बाकी
तो ही लांब नाही दिस
स्वाभिमान शिकवला शिवरायांनी
वायाच गेलं त्यांचं काम
इंग्रज गेले देश सोडून
हे स्वाभिमानशून्य राहिलेत गुलाम
--- लबाड बोका
तेच स्वत: सांगतात मुलांना
आम्हाला पप्पा मम्मी म्हणा
आई बाबा म्हणवून घ्यायला
वाटतो त्यांना कमीपणा
मराठी म्हणवून घ्यायची पण
वाटत असते त्यांना लाज
मराठीलाच नाकं मुरडायची
त्यांना असते भारी खाज
देवधर्म सुद्धा करतात
आता इंग्लीशमधून
नजर त्यांची फक्त सुखावर
जातात देवही सोडून
ते ही हिंदू मी ही हिंदू
करतात मला ख्रिसमस विश
ख्रिश्चनच व्हायचं राहिलंय बाकी
तो ही लांब नाही दिस
स्वाभिमान शिकवला शिवरायांनी
वायाच गेलं त्यांचं काम
इंग्रज गेले देश सोडून
हे स्वाभिमानशून्य राहिलेत गुलाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा