२६१. यत्ता
लबाडाची जात आमची
लबाडाची जात
जिथे जिथे मिळेल तिथे
मारतो आम्ही हात
मढ्याच्याही टाळूवरचे
खातो आम्ही लोणी
आमच्याइतके नीच जगात
दुसरे नाही कोणी
पाप नाही पुण्य नाही
नाही साधन सुचिता
वेगळेच असतात मार्ग आमचे
मानत नाही उचिता
येन केन प्रकारेण
हवी आम्हास सत्ता
तिच आमची मत्ता आणि
तिच आमची यत्ता
--- लबाड बोका
लबाडाची जात आमची
लबाडाची जात
जिथे जिथे मिळेल तिथे
मारतो आम्ही हात
मढ्याच्याही टाळूवरचे
खातो आम्ही लोणी
आमच्याइतके नीच जगात
दुसरे नाही कोणी
पाप नाही पुण्य नाही
नाही साधन सुचिता
वेगळेच असतात मार्ग आमचे
मानत नाही उचिता
येन केन प्रकारेण
हवी आम्हास सत्ता
तिच आमची मत्ता आणि
तिच आमची यत्ता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा