२६४. कोण श्रेष्ठ ?
जनावरं फिरतात नागडी उघडी
माणूस घालतो अंगभर कपडे
ढोल पिटतो संस्कारांचा
आणि करतो गुपचूप लफडे
एकटी दुकटी रात्री अपरात्री
फिरू शकते जनावराची मादी
नागडी उघडी असून सुद्धा
होत नाही तिची बरबादी
कोणताही धर्म नसलेली जनावरं
निसर्ग धर्माचं करतात पालन
मादीच्या पसंती संमती शिवाय
जनावरं करत नाहीत मिलन
नागडी उघडी फिरणारी जनावरं
माद्यांचा करतात आदरसत्कार
जनावरांहून श्रेष्ठ माणूस मात्र
असहाय्य स्त्रीवर करतो बलात्कार
--- लबाड बोका
जनावरं फिरतात नागडी उघडी
माणूस घालतो अंगभर कपडे
ढोल पिटतो संस्कारांचा
आणि करतो गुपचूप लफडे
एकटी दुकटी रात्री अपरात्री
फिरू शकते जनावराची मादी
नागडी उघडी असून सुद्धा
होत नाही तिची बरबादी
कोणताही धर्म नसलेली जनावरं
निसर्ग धर्माचं करतात पालन
मादीच्या पसंती संमती शिवाय
जनावरं करत नाहीत मिलन
नागडी उघडी फिरणारी जनावरं
माद्यांचा करतात आदरसत्कार
जनावरांहून श्रेष्ठ माणूस मात्र
असहाय्य स्त्रीवर करतो बलात्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा