२६५. गारूड
घालतो मी कवितांमधून
भावनांनाच सरळ हात
प्रयत्न करतो लावण्याचा
वातीनेच दुसरी वात
कविता असतात उत्कट माझ्या
कृत्रिमतेचा नसतो लेश
त्या दैवी कृपेचा प्रसाद
तुमच्यासाठीही करतो पेश
विचार माझ्या कवितांमधले
होतील मनावरती आरूढ
जेव्हा वाचाल कविता माझ्या
आपोआपच पडेल गारूड
--- लबाड बोका
घालतो मी कवितांमधून
भावनांनाच सरळ हात
प्रयत्न करतो लावण्याचा
वातीनेच दुसरी वात
कविता असतात उत्कट माझ्या
कृत्रिमतेचा नसतो लेश
त्या दैवी कृपेचा प्रसाद
तुमच्यासाठीही करतो पेश
विचार माझ्या कवितांमधले
होतील मनावरती आरूढ
जेव्हा वाचाल कविता माझ्या
आपोआपच पडेल गारूड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा